टपाल विभागातर्फे राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन

टपाल विभागातर्फे राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन

*कोकण Express*

*टपाल विभागातर्फे राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन……*

*ओरोस, ता. ०४*

भारतीय डाक विभागामार्फत यावर्षी “ढाई आखर” राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा विषय “नवीन भारतासाठी डिजिटल इंडिया” असा असून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पत्र स्वीकारले जाणार आहेत. ही स्पर्धा खुली असून १८ वर्षापर्यंत व १८ वर्षावरील अशा दोन गटात होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक डाकघर मयूर कोले यानी कळविले आहे… पत्र लेखनाकरिता शब्द मर्यादा पोस्ट लिफाफा, साधा लिफाफ्यामधून (आवश्यक तिकीट लावून) ए4 साइज पेपर वर जास्तीत जास्त १००० शब्द व आंतरदेशीय पत्रावर जास्तीत जास्त ५०० शब्द आहे. स्पर्धकांनी लिफाफ्यावर, आंतरदेशीय पत्रावर आपले नाव व संपूर्ण पत्ता लिहावा तसेच लिफाफा, आंतरदेशीय पत्रावरील बाजूस “ढाई आखर” राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा असे नमूद करावे. स्पर्धकानी ही पत्रे ३१ ऑगस्त्व २०२३ पर्यंतच चीफ पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!