*कोकण Express*
*भारतीय मजदूर संघाच्या वर्धापनदिना निमित्त संघटनेच्या सर्वात मोठ्या ध्वजाचे अनावरण*
*कासार्डे : संजय भोसले*
भारतीय मजदूर संघाच्या ६८ व्या स्थापनादिनी साळिस्ते येथील सर्व कामगार वर्ग एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनेच्या सर्वात मोठ्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन भारतीय मजदुर संघ जिल्हा संघटक ओमकार दिपक गुरव यांच्या नेतृत्वाखाली भारतिय मजदुर संघ तळेरे प्रभागाने केलेले होते.
भारतीय मजदूर संघ ही देशात प्रथम क्रमांकावर असलेली कामगार संघटना असून सध्या भारतीय मजदुर संघाकडे तीन कोटी हुन अधिक सभासद नोंदीत आहेत. तर जवळ जवळ ६,५०० हुन अधीक विविध संघटना भारतीय मजदुर संघाशी संलग्नित आहेत असे जिल्हा संघटक ओमकार गुरव यांनी उपस्थित कामगार वर्गाला माहिती दिली. यावेळी या संघटनेचा मी सभासद असल्याचा मला अभिमान आहे असे भारतीय मजदुर संघ साळिस्ते अध्यक्ष संतोष पाष्टे यांनी सांगितले.
त्यानंतर कामगार वर्ग मोठं मोठ्याने संघटनेच्या घोषणा देत ध्वजारोहण मोठया उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा संघटक ओमकार गुरव, साळिस्ते गाव अध्यक्ष संतोष पाष्टे, उपाध्यक्ष प्रेमलता गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण ताम्हणकर आणि सर्व कामगार वर्ग उपस्थित होते. अध्यक्ष संतोष पाष्टे यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.