आशिये गावात राणेंना धक्का

*कोकण Express*

*आशिये गावात राणेंना धक्का*

*माजी सरपंच रश्मी बाणे व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील आशिये गावच्या माजी सरपंच रश्मी बाणे यांसह भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थांनी रविवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला.कणकवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.सौ.रश्मी बाणे या आशिये गावच्या बिनविरोध सरपंच राहिल्या आहेत.भाजप पक्षाच्या त्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. गावात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.त्यामुळे सौ.बाणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राणेंना व भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर,जिल्हा प्रमुख संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विभागप्रमुख अनुप वारंग यांच्या मार्गदर्शनाखाली तर आशियेतील शिवसैनिक जगन्नाथ आजगावकर, शाखा प्रमुख संदीप जाधव, सुदर्शन गुरव, अमोल आजगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश घेण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच रश्मी बाणे,विद्याधर चव्हाण, संदीप ठाकूर, अभिषेक बाणे, सिद्धेश बाणे आदींनी प्रवेश केला.

यावेळी जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर,जिल्हा प्रमुख संजय पडते, अप्पा पराडकर, अतुल रावराणे, सौ.नीलम पालव, तालुका प्रमुख शैलेश भोगले,प्रथमेश सावंत, राजू राठोड, अनुप वारंग, निसार शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!