जैव वैद्यकीय कच-याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय बेपर्वा, उघड्यावर जाळल्याने बीएमडब्लू रूल २०१६ चे उल्लंघन !

जैव वैद्यकीय कच-याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय बेपर्वा, उघड्यावर जाळल्याने बीएमडब्लू रूल २०१६ चे उल्लंघन !

*कोकण Express*

*जैव वैद्यकीय कच-याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय बेपर्वा, उघड्यावर जाळल्याने बीएमडब्लू रूल २०१६ चे उल्लंघन !*

*ओरोस*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयातून जैववैद्यकीय कचरा जमा करून इन्सीनेटरच्या सहाय्याने BMW रुल 2016 च्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नेमून दिलेल्या संस्थाद्वारे निर्मुलन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच जैववैद्यकीय कचरा जाळण्यात येत असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. यावर कोल्हापूरचे सुशांत पोवार यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डसह पंतप्रधान कार्यालय येथे देशाचे आरोग्य बिघडविणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाईची विशेष मागणी इमेलद्वारे करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या आवारात शवच्छेदन रुमच्या शेजारी मोठा खड्डा पाडून जैव वैद्यकीय कचरा जळत असल्याचे निदर्शनास आले तसेच कचरा जाळत असलेल्या खड्ड्यात जैव वैद्यकीय कचरा भरलेल्या लाल, निळी आणि पिवळी प्लास्टिक बॅॅग ठेवल्याचे आढळून आले त्यामुळे सदरचा जैव वैद्यकीय कचरा नेमेके किती वर्षे झाले जळतात ते समजू शकले नाही परंतु सदर घटनेची माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे कळविली असून सोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव यांच्यासह डॉ.अमर सुपाते तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे कारवाईची मागणी सुशांत पोवार यांनी केली आहे.
घातक वैद्यकीय कचरा हा संसर्गजन्य कचरा असून, त्याकडे गांभीर्याने न पाहिल्यास तो नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरू शकतो. घातक वैद्यकीय कचरा उचलण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नेमून दिलेल्या संस्थेला ठेका दिला आहे. परंतु शासनाकडून हजारो रुपयांची या संस्थेला बिले देऊन हि जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर जाळण्याची वेळ सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयावर का यावी ? हा संशोधनाचा विषय आहे. नेमण्यात आलेल्या संस्थेची वाहने फिरूनही सिंधुदुर्ग मधील जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यास सक्षम नाहीत हेच यावरून दिसते. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात या संस्थेची वाहने लवकर येत नसल्यास आणि वेळेवर कचरा उचलला जात नसल्याची तक्रार असल्यास जबाबदार संस्थेवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कारवाई करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.
प्लास्टीक कचऱ्याप्रमाणेच जैव- वैद्यकीय कचऱ्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर व मानवाच्या आरोग्यावर होत आहे. त्याअनुषंगाने जैव-वैद्यकीय कचऱ्याचे पर्यावरणदृष्टया सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!