*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु फुलझेले यांची स्वेच्छा निवृत्ती तर कनिष्ठ लिपिक श्री. रमेश परब निवृत्त*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटचे प्राचार्य डॉ. विष्णू हेमलाल फुलझेले यांनी आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक अडचणीमुळे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. महाविद्यालयाचे कनिष्ठ लिपिक श्री. रमेश परब हे सुध्दा आपल्या नियत वयोमानानुसार सेवा निवृत्ती होत आहेत. दिनांक ३१ मे २०२३ रोजी डॉ. फुलझेले व श्री. रमेश परब यांचा निरोप समारंभ संस्थेच्या कार्यालयात आयोजित केला आहे.
मागील वर्षभर डॉ. विष्णु फुलझेले महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर कार्यरत होते. आपल्या कार्यकाळात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर त्यांनी लक्षपूर्वक काम केले आणि प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु त्यांनी आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक कारणामुळे स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे.
त्याचबरोबर महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक श्री. रमेश तुकाराम परब हे आपल्या नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. श्री. रमेश तुकाराम परब यांनी महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या काळापासून महाविद्यालयाची सेवा बजावली. मनमिळाऊ स्वभाव,खुमासदार वक्तृत्व व सर्व समावेशक व्यक्तिमत्व यामुळे संस्थेचे सर्व संचालक तसेच संस्थेतील सर्वच कर्मचारी यांचे ते लाडके झाले. महाविद्यालया पोटी असणारे प्रेम हे त्यांचे सर्वश्रुत आहे.
महाविद्यालयातील या दोन्ही कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ संस्थेने बुधवार दिनांक ३१मे २०२३ रोजी सकाळी साडेअकरा वाजता संस्थेच्या कार्यालयात आयोजित केला आहे.