बारावी परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सारीकाकुमारी यादव हिचा उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे खास गौरव

बारावी परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सारीकाकुमारी यादव हिचा उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे खास गौरव

*कोकण Express*

*बारावी परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सारीकाकुमारी यादव हिचा उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे खास गौरव*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सारीकाकुमारी यादव हिना उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे तिच्या घरी जात तिचे अभिनंदन करीत शहर प्रमुख अजित राऊळ व वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी गरीबीतून शिक्षण घेत कोणतेही क्लास न घेता कॉलेजमधील शिक्षण व घरी अभ्यास मेहतीने करून मिळविलेल्या यशाबद्दल खास गौरव केला.
बिहार राज्यातून मोलमजुरीच्या कामानिमीत गेली १५ वर्षे वेंगुर्ले तालुक्यात भाड्याच्या घरातं वास्तव्य राहिलेल्या कुटुंबाचे प्रमुख सरोज यादव हे सेंटरींगची कामे प्रामाणिकपणे वेंगुर्ले तालुक्यात काम करत आहेत. त्यामुळे आर्थिक परीस्थिती बेताची असताना त्यांनी आपली मुली सारीकाकुमारी यादव हिला शिक्षण देण्यासाठी केलेला प्रयत्न तसेच सारीकाकुमारीने आर्थिक परीस्थितीवर मात करी घेत असलेल्या शिक्षणात उज्वल यश संपादन केल्याबद्दल शिवसेनेचे वेंगुर्ले तालुका संपर्क प्रमुख भालचंद्र चिपकर यांनीही तिचा खास गौरव केला. यावेळी पुढील शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणी तसेच लागणाऱ्या कागदपत्रांसाठी पुर्ततेसाठी शिवसेनेच्या माध्यमातून आपण सहकार्य करून असे आश्वासन माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शहर प्रमुख अजित राऊळ व तालुका संपर्क प्रमुख भालचंद्र चिपकर यांनी दिले.
यावेळी फरान शेख, रमित शेख विशाल जगताप, पप्या गावडे, तसेच कॅम्प गवळीवाडी येथील उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!