कणकवली विकासकामे केल्यामुळेच विरोधकांना पोटसुळ

कणकवली विकासकामे केल्यामुळेच विरोधकांना पोटसुळ

*कोकण Express*

*कणकवली विकासकामे केल्यामुळेच विरोधकांना पोटसुळ….!!*

*जनतेला खोटं बोलायचे ते रेटून बोलायचे अशी सवय सुशांत नाईक आणि पारकर यांची*

 *नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा पलटवार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली भाजी मार्केट येथील सुलभ शौचालय नवीन इमारत बांधकाम आवश्यक असलेल्या अंदाजपत्रकांनुसारच बनवण्यात येत आहे. त्या ठिकाणी इमारतीत तळमजला पुरुष, स्त्रियांसाठी बाथरुम, मोठी आरसीसी वॉटर प्रुप सेफ्टी टैंक, सेफ्टी वॉल यासारखी कामे होणार आहेत. कणकवली विकासकामे केल्यामुळेच विरोधकांना पोटसुळ असल्याचा पलटवार माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पलटवार केला. तसेच एवढे पैसे मिळत असतील तर आमदारकी सोडून वैभव नाईक कणकवलीत निवडणूक लढतील, असा टोला समीर नलावडे यांनी लगावला.

कणकवली खरेदी विक्री संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक संजय कामतेकर, विराज भोसले, अभिजीत मुसळे, अजय गांगण आदी उपस्थित होते.

नगरपंचायत कामांवर आरोप केले हे चुकीचे आहेत. सुलभ शौचालय बांधण्याचे काम केलं जात आहे, त्याबाबत जनतेला वस्तुस्थिती समजली पाहिजे, गेल्या पाच वर्षात हे विरोधी पक्ष म्हणून काम करतात. राज्यात यांचीही सत्ता असताना काय बोलू शकले नाही. आमच्या कामाचे दखल घेवून राज्यात नगरपंचायतचा एक नंबर आला आहे. त्याबद्दल विरोधकांना पोटशूळ सुटल्याने हे जनतेची दिशाभूल करण्यासाठी बेताल आरोप करत असल्याचे बंडू हर्णे यांनी सांगितले.

सुलभ शौचालय बांधकाम जीएसटी व अन्य कर वगळता अंदाजपत्रक ६९ लाख ९३ हजार आहे. टोटल बांधकाम ८०२ स्क्वेअर फूट आहे. वरचा मजला ५७५ स्क्वेअर फूट असून त्यात पत्रा शेड आणि किचन आहे. त्या मध्ये पुरुष, स्त्रियांसाठी बाथरुम, मोठी आरसीसी वॉटर ग्रुप सेफ्टी टैंक, सेपटी वॉल यासारखी कामे होतील. त्यामुळे खालचा मजला सिव्हील वर्क मध्ये ३६८३ रुपये दराप्रमाणे काम होणार आहे. बाथरूमच्या काम आहे, अपंगांसाठी वेगळी व्यवस्था आहे बाथरुम पुरुषासाठी आणि महीलांसाठी आहे. प्लीथ ते टॉप टोटल टाईल्स आणि ग्रॅनाईट आहेत. डोअर आणि विंडो बाथरूम हे ग्रॅनाईट मध्ये आहे. सीलिंग पीओपी मध्ये आहेत. त्यामुळे या शौचालयाचे काम अत्यंत अद्यावत पद्धतीने केले जाणार असल्याची माहिती बंडू हर्णे यांनी दिली.

शिवसेनेचे खासदार आणि आमदार आहेत, जर चुकीचे काम असेल तर खरोखर चौकशी लावावी, आम्ही तयार आहोत. जनतेला खोटं बोलायचे ते रेटून बोलायचे अशी सवय सुशांत नाईक आणि पारकर यांची आहे. देवाकडे प्रार्थना करूनही सत्तेवर येणार नसल्याने हा विरोधकांचा खटाटोप असल्याचा टोला समीर नलावडे यांनी लगावला.

• विरोधी पक्ष म्हणून त्यांची जबाबदारी होती आरोपांची.. आता ५ वर्ष झाल्याने सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले आहेत नगरपंचायत मध्ये एवढे पैसे मिळत असतील तर वैभव नाईक आमदारकी सोडून कणकवलीत निवडणुकीला उभे राहतील. खासदार आणि आमदार रेल्वे स्टेशन गार्डन करणार असा शब्द दिला होता. पारकर आणि नाईक एस टी स्टैंड गाळे देणार असे जाहीर केलं होत त्याचे काय झाले? छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विषयात वैभव नाईक, पारकर यांनी विरोध केला होता आमच्या ताकदीवर करुन दाखवले. मोर्चाची भाषा करताहेत, या तुम्ही आम्ही तयार आहोत. आता सनराईज टॉवर मध्ये सुशांत नाईक यांच्याकडे लाखो रुपये गुंतवले आहे. आता त्या गाळ्यांची ओसी होत नाही. त्या विरोधात मी आंदोलन छेडणार आहे. लोकांची फसवणूक केली आहे, असा आरोप समीर नलावडे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!