कट्टा आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनने आ. वैभव नाईक यांचा केला सत्कार

कट्टा आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनने आ. वैभव नाईक यांचा केला सत्कार

*कोकण Express*

*कट्टा आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनने आ. वैभव नाईक यांचा केला सत्कार*

*मतदारसंघात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केले सन्मानित*

गेले दोन टर्म आमदार म्हणून वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांच्या या कामगिरी बद्दल आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशन कट्टा यांच्यावतीने मंगळवारी आ. वैभव नाईक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष शिवा भोजने, गिरी चव्हाण, संदीप पोफळे, वंदेश ढोलम, गणेश वाईरकर, सुनील शिरोडकर, राजू भोगटे यांच्यासह शिवसेनेचे बाळ महाभोज, बाबू टेंबुलकर, दर्शन म्हाडगुत, कुणाल फाटक, दीपक भोगटे,संतोष गावडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री माने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!