मिसळ महोत्सवाचा शुभारंभ १६ एप्रिल रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन!

मिसळ महोत्सवाचा शुभारंभ १६ एप्रिल रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन!

*कोकण Express*

*मिसळ महोत्सवाचा शुभारंभ १६ एप्रिल रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन!*

*झणझणीत मिसळ आणि अभिजीत कोसंबी चा स्वर देवगड मधील खवय्यांना महापर्वणी*

*देवगड ः प्रतिनिधी*

आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मिसळ महोत्सवाच्या शुभारंभ १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आम. नितेश राणे यांच्या हस्ते देवगड कॉलेज नाका येथे सावंत कंपाउंड मध्ये होणार आहे मिसळीचा झणझणीत स्वाद व सारेगामा फेम प्रसिद्ध गायक अभिजीत कोसंबीचा स्वर अशी महापर्वणी देवगड वासियांना लाभणार आहे हा मिसळ महोत्सव १७ तारीख पर्यंत असणार आहे.

देवगड वासियाना महाराष्ट्रातील विविध भागातील पंधरा मिसळींचा स्वाद या निमित्ताने घेता येणार आहे याबाबतची माहिती देवगड शहर

भाजपाच्या वतीने देण्यात आली.

देवगड जामसांडे शहर अध्यक्ष योगेश पाटकर त्यांच्या सोबत युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, मिलिंद माने, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, माजी नगरसेवक संजय तारकर माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळी सारेगामा फेम अभिजीत कोसंबी व तृप्ती कुडाळकर यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये विविध लोकसंगीताचे प्रकार सादर होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक जयवंत भालेकर व परी तेलंग करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!