*कोकण Express*
*…आधी आमच्या मागण्या व प्रलंबित प्रश्न सोडवा तेव्हाच काम सुरू करा*
*संतप्त नरडवे धरण प्रकल्प ग्रस्तांच्या प्रतिक्रिया.!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील नरडवे इस गाव मागील काही वर्षापासून धरण प्रकल्पाच्या विळख्यात सापडले आहे. येथील लोकांना वेगवेगळी आमिष दाखवण्यात आल्याच्या प्रतिक्रिया देखील ग्रामस्थांनी मांडल्या. तर काही राजकीय नेते मंडळींनी स्वतः त्या ठिकणी जाऊन धरण प्रकल्पाची पाहाणी केली होती. त्यावेळी धरण कामाबाबत काही त्रुटी देखील काढण्यात आल्या होत्या परंतु काढलेल्या त्रुटीमध्ये सुधारणा नव्हती. तर काही जमिनदारांच्या जमिनी गेल्या जे लोक धरण प्रकल्प बाधित झाले त्यांना अद्यापही कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई असेल किंवा मोबदला तो अद्याप न मिळाल्याने ग्रामस्थांनी 90% पूर्ण झालेले काम पुढे रोखले.
आधी आमच्या मागण्या व प्रलंबित प्रश्न सोडवा तेव्हाच काम सुरू करा अन्यथा आम्ही मोठ्या संख्येने एकत्र झालोच आहोत काम सुरू करूनच दाखवा. तसेच भविष्यात येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे देखील प्रकल्पग्रस्तांनी ठरविले आहे. याचा नक्कीच मोठा परिणाम भविष्यात होणाऱ्या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. मात्र आता राजकीय नेते मंडळी त्या ठिकाणी पोहोचून काही योग्य मार्ग काढणार की त्या लोकांना वाऱ्यावरच सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

