*कोकण Express*
*सावंतवाडीत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*शिंदे गटाकडुन जोरदार शक्ती प्रदर्शन; नागरिकांसह विविध हिंदू संघटनांचा मोठा सहभाग…..*
*सावंतवाडी ःःप्रतिनिधी*
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव करण्यासाठी भाजप आणि शिंदे गट यांच्या माध्यमातून सावंतवाडीत आज काढण्यात आलेल्या गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात विधानसभा मतदार संघातील नागरिकांसह विविध हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी शिंदे गटाकडुन जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो..!!”, “भारत माता की जय..!!”, “वंदे मातरम..!!” अशा घोषणा देत ही रॅली शहरात फिरविण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व माजी आमदार राजन तेली व शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्याकडुन करण्यात आले.
शहरातील शिवराम राजे पुतळ्याकडे शिंदे शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शहरातील हॉटेल मँगो टू, रेस्ट हाऊस सालईवाडा, जयप्रकाश चौक, गांधी चौक, उभा बाजार अशी यात्रा काढण्यात आली. त्याचा समारोप शहरातील नारायण मंदिरासमोर करण्यात आला. डोक्यावर “मी सावरकर’ अशी भगवी टोपी व हातात “मी सावरकर” अशा आशयाचा फलक घेऊन हिंदू प्रेमी यात्रेत
सहभागी झाले होते.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील हिंदू प्रेमी व हिंदू संघटनांनीही या यात्रेत सहभाग दर्शविला होता. दरम्यान यात्रेचा समारोप सभेत
झाल्यानंतर शिंदे शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थिताना संबोधित करण्यात आले.
यावेळी श्री तेली म्हणाले, राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा निघत असताना आज सिंधुदुर्गात पहिलीच सावंतवाडी मतदारसंघात ही
यात्रा काढण्यात आली. यात्रेला हिंदू प्रेमींनी दाखवलेला सहभाग लक्षात घेता विरोधकांना व सावरकरांवर टीका करणाऱ्यांना एक प्रकारे चपराक आहे. त्यामुळे यापुढे कोणीही सावरकरांवर अपमानास्पद शब्द काढण्याची हिंमत करणार नाही, आज राज्य सरकार एकामागून एक गतिमान असे निर्णय घेत असताना विरोधकांकडे टीका करण्यासाठी काहीच कारण नाही नको ते विषय पुढे करून ते आज देशात राजकारण करत आहेत, ज्याप्रमाणे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रेच्या निमित्ताने शिवसेना शिंदे व भारतीय जनता पार्टी तसेच हिंदू प्रेमी एकत्र आले तसेच यापुढे सर्वांनी एकत्र राहून अशा गोष्टींचा विरोध करू,
• शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री दळवी म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी दिलेले बलिदान पाहता आजची ही यात्रा म्हणजे त्यांचा
गौरव आहे ज्यांनी सावरकरांवर टीका केली त्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, यावेळी सही स्वागत नाटेकर या छोट्या मुलीने सावरकर
यांच्यावर केलेले भाषण सर्वांच्या अंगावर शहारा आणणारे ठरले.
या रॅलीत माजी आमदार राजन तेली, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, बाबू कुडतरकर, बबन राणे, रवींद्र मडगावकर शेखर गावकर, मंदार कल्याणकर, प्रमोद कामत, पुखराज पुरोहित, पंकज पेडणेकर, अरूण वझे, मनोज नाईक, अजय गोंदावले, शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख नीता कविटकर, एकनाथ नाडकर्णी, परिमल नाईक, सुधीर आडीवरेकर, शुभांगी सुकी, प्रमोद गावडे, उत्कर्षा सासोलकर, परशुराम चलवाडी, निलिमा चलवाडी, नारायण हिराप, गुरूनाथ पेडणेकर, आनंद नेवगी, बाळ पुराणिक, दिलीप भालेकर आदि सहभागी झाले होते.