कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील घटना

कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील घटना

*कोकण Express*

*कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील घटना*

*संशयीतांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद”

उसाच्या शेतीमधून मागितलेला रस्ता न दिल्याचा राग मनात ठेऊन वाघेरी कुळ्याचीवाडी येथील विनोद सोनू लाड यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी तेथीलच योगेश जगन्नाथ राणे व भूषण प्रशांत कदम यांना येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेला आदेश सहाय्यक जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी सरकारपक्षाचे अपिल फेटाळत कायम केला. आरोपींच्यावतीने अॅड उमेश सावंत यांनी काम पाहिले. २५ नोव्हेंबर २०१४ रोजी फिर्यादी विनोद लाड हे सायंकाळी बैलगाडीत.

भाताच्या गोण्या भरून पियाळी गिरणीवर जात असताना रेल्वे पुलाच्यालगत निर्जनस्थळी डबऱ्याचा माळ येथे आरोपी योगेश राणे याने मागून बैलगाडीवर चढून चिव्याच्या दांड्याने लाड यांच्या डोक्यावर, उजव्या हातावर पंजावर, मानेवर व इतरत्र फटके मारून डोके फोडले व इतर गंभीर जखमा केल्या. तर भूषण कदम याने फिर्यादीस सहकार्य करून गुन्हा करण्यासाठी मदत केली. घटनेनंतर रेल्वे ट्रॅकमन चंद्रकांत नारकर याच्या मोटारसायकलने जखमी अवस्थेत लाड दत्ताराम सुतार यांच्या पियाळी येथील गिरणीवर गेला. त्यानंतर प्रा. आ. केंद्र फोंडाघाट व जिल्हा रुग्णालय येथे दाखल असताना ओरोस पोलिसाकडे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२५, ३२६, ३२३ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. येथील न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले होते. साक्षीतील तफावती, वैद्यकीय पुराव्यातील विसंगीत, घटनास्थळ पंचनाम्याबाबतची संदिग्धता, पोलीस तपासातील त्रुटी यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती… याविरुद्ध सरकार पक्षाने सत्र न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्यावर झालेल्या सुनावणीत कणकवली न्यायालयाचा आदेश योग्य काढत अपिल फेटाळण्यात आल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!