*कोकण Express*
*चिंदर मधील सडेवाडी, पालकरवाडी, कुंभारवाडी जि. प. शाळांना ब्रेन डेवलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत सुयश ; रेणू शेतसंधीला सुवर्ण पदक*
यंदा जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलमेंट स्कॉलरशीप परीक्षेत चिंदर केद्रांच्या विविध शाळांनी घवघवीत यश संपादन केले. जि. प. शाळा चिंदर कुंभारवाडी शाळेच्या कु. रेणू भिमाशंकर शेतसंदी हिने १०९ पैकी ९८% गुण प्राप्त करुन ऑल इंडिया रँक मध्ये ९ वा क्रमांक तर पहिली इयत्तेतून जिल्ह्यात प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. कुंभारवाडी शाळेच्याच गंधर्व नारायण चिंदरकर इ. २ री ९०% व श्रेयस राजेंद्र चौधरी इ. ३ री यांनी ९२% गुण मिळवत रौप्य पदक तर विराज कांबळे हा इ. १ ली ७५% गुणांसह उत्तीर्ण झाला.
सडेवाडी जि. प. शाळेच्या संग्राम सयाजी पवार इ. २ री याने ८५% गुण मिळवत ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले, तर श्रावणी स्वप्नील सुर्वे इ. ४ थी ५७%, राहुल संतोष गोसावी इ ३ री ५४%, वेदांत वैभव गोसावी इ. ३ री यांनी
६२ % गुण प्राप्त करत यश संपादन केले.
पालकरवाडी जि. प. शाळेच्या सार्थक शिवानंद सोलापूरे इ २री ९१% गुण मिळवत रौप्यपदक, लिखित – दिशांत पडवळ इ. ३ री ८५% व अवंतीका दयानंद प्रचंडे इ २ री ८७% गुण मिळवत कांस्य पदक प्राप्त केले. मिहीर मिलिंद चिंदरकर इ २ री ७६%, युवराज दयानंद प्रचंडे इ. ४थी ७०%, समर्थ शिवानंद सोलापूरे इ ४ थी ६५% गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले आहे..
यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, यशवंत पाटील, संभाजी पवार, भिमाशंकर शेतसंदी, राजेंद्र चौधरी, शिवानंद सोलापुरे, नंदकुमार जुंदळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशा बद्दल यशवंतांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.