स्टॉल हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ना. नारायण राणे घेणार एकत्रित बैठक

स्टॉल हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ना. नारायण राणे घेणार एकत्रित बैठक

*कोकण Express*

*स्टॉल हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ना. नारायण राणे घेणार एकत्रित बैठक*

*स्टॉल धारकांनी घेतली केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट**कणकवली ः प्रतिनिधी*कणकवली उड्डाणपुलाखालील
स्टॉल हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शनिवार १८ मार्च रोजी नगराध्यक्ष, महामार्ग प्राधिकरण अधिकारी,नगरपंचायत प्रशासन आणि मुख्याधिकारी व कणकवलीच्या उड्डाणपुलाखाली असलेल्या स्टॉल धारकांची एकत्रित बैठक घेऊन याविषयी कोणता तोडगा काढता येईल काय ? याची चर्चा करू असे आश्वासन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे स्टॉल धारकांना दिले.

कणकवली शहरातील उड्डाण पुलाखाली असलेले अनधिकृत स्टॉल हटवण्याची मोहीम महामार्ग प्राधिकरणने सुरुवात केली. त्याबाबतची तक्रार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी जाऊन स्टॉल धारकांनी केली. या संदर्भात शनिवारी एकत्रितरीत्या बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले. स्टॉल धारकांनी आपल्याला पर्यायी जागा सुचवावी असेही आवाहन यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.तुम्ही पर्याय सुचवा त्यावर आपण चर्चा करू आणि एकत्रितपणे तोडगा काढून असे त्यांनी सांगितले.ओम गणेश निवास्थानी स्टॉल धारकांच्या शिष्टमंडळासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सविस्तर चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!