खांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न

खांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न

*कोकण Express*

*खांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न*

*शिवसेना शाखा खांबाळे व मंगेश लोके मित्रमंडळाचे आयोजन*

*शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांची प्रमुख उपस्थिती*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

*खांबाळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे जयंती दिनांक-१० मार्च २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाली.*
*शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सरपंच गौरी पवार यांचे हस्ते तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मुंबई निवृत्त पोलीस अधिकारी प्रभाकर लोके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.*
*यावेळी उपसरपंच गणेश पवार, सोसायटी माजी चेअरमन दीपक चव्हाण, माजी सरपंच विठोबा सुतार, जेष्ठ ग्रामस्थ अशोक पवार, रामदास पवार,माजी उपसरपंच लहू साळुंखे, दीपक पवार, रुपेश कांबळे, गणेश सदाशिव पवार, ग्रामपंचायत सदस्य अमोल चव्हाण, सोसायटी सचिव सिद्धेश रावराणे, मंदार पालकर, संकेश पवार, सुतार,मेघनेश पवार, प्रसाद कदम, सुनिल गुरव, मिलिन पवार, दिनेश पालकर, मंगेश कांबळे, जयेश पवार, पंकज चव्हाण, राजेंद्र पवार, बाळा गुरव, समीर पवार, किशोर सुतार, प्रभाकर पवार, संदीप पवार, प्रशांत गुरव, बळीराम सावंत, महादेव पवार, प्रभाकर पाताडे आदि गावातील ग्रामस्थ व शिवसैनिक व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
सायंकाळी ४.०० वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ संपन्न होणार आहे.
सायंकाळी ६.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा सादर केली जाणार आहे.
सायंकाळी ६.०० वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख सतिश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!