*कोकण Express*
*विलवडे येथील सुभाष दळवी राज्याच्या स्वच्छ्ता अभियानाचे राज्य समन्वयक…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
विलवडे गावचे सुपुत्र तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी व स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख सुभाष दळवी यांची महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज देशभरातील विविध धार्मिक स्थळी दिसणाऱ्या निर्माल्य कलशांचे ते जनक असुन कचरा व्यवस्थापनाच्या ‘दळवी पॅटर्न’ चेही तेच संकल्पक आहेत. तसेच धारावीसारख्या आव्हानात्मक परिसरात त्यांनी स्वच्छता अभियान शक्य करून दाखवले. त्यांच्या या स्वच्छता व पर्यावरण संतुलन कार्याची दखल घेऊन त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.