*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आश्वासनानंतर नांदगाव रेल रोको आंदोलन स्थगित*
*कणकवली ः प्रतिनिधी*नांदगाव रेल्वे स्टेशन येथे कोरोना काळात बंद असलेली तुतारी एक्स्प्रेस या रेल्वे गाडीचा थांबा पूर्ववत करावा यासाठी राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत दि. ४ मार्च रोजी रेलरोकोचा इशारा दिला होता. दरम्यान याबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दखल घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पत्रव्यवहार करून पुढील रेल्वे बोर्डाच्या बैठकीत नांदगाव स्टेशनला तुतारी एक्स्प्रेस थांबविण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन रेल्वे मंत्री यांच्याकडून मिळाले असल्याने शनिवार दि. ४ मार्च रोजी होणारा रेलरोको आंदोलन स्थगित केल्याचे आंदोलकाच्या वतीने संतोष राणे, बाबू घाडी, गणेश गुरव, प्रदीप घावरे, रविंद्र सावंत, महेश मोंडकर ,मुरलीधर राणे यानी सांगितले आहे.