बांदा सटमटवाडी येथील रस्त्याचे सरपंचांच्या हस्ते भूमिपूजन

बांदा सटमटवाडी येथील रस्त्याचे सरपंचांच्या हस्ते भूमिपूजन

*कोकण Express*

*बांदा सटमटवाडी येथील रस्त्याचे सरपंचांच्या हस्ते भूमिपूजन…*

*बांदा ःःप्रतिनिधी* 

येथील सटमटवाडी येथील श्री रामभट स्वामी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन संपन्न झाले. गेली कित्येक वर्षे या रस्त्याची मागणी होत होती.
यावेळी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, सदस्या रुपाली शिरसाट, सागर सावंत, तातो परब, सचिन विर, देवा कळंगुटकर, मकरंद गोरे आदी उपस्थित होते.
१७० मिटर लांबीच्या या रस्त्यासाठी नागरी सुविधा अंतर्गत ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रस्त्याचे काम मंजूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!