आंगणेवाडी श्री भराडी देवी जत्रोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष जादा बस सेवेचे आयोजन

आंगणेवाडी श्री भराडी देवी जत्रोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष जादा बस सेवेचे आयोजन

*कोकण Express*

*आंगणेवाडी श्री भराडी देवी जत्रोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष जादा बस सेवेचे आयोजन*

*मिरा भाईंदर मधील भाविकांनी सदर बस सेवेचा लाभ घ्यावा*

*कोकण सेवा संस्थेचे अध्यक्ष मनोज प्रताप राणे यांनी केले आवाहन*

कोकणातील प्रति पंढरपूर म्हणुन ओळख असलेले,लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी चा वार्षिकोत्सव शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे.
याच धर्तीवर मिरा भाईंदर मधील भाविकांना सोयीस्कर रीत्या व रास्त दरात देवीच्या दर्शनासाठी पोहचता यावे या भावनेने राज्य परिवहन महामंडळ,ठाणे यांच्या वतीने *कोकण सेवा संस्थेने केलेल्या मागणीनुसार* बोरिवली ते आंगणेवाडी ज्यादा बस ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सोडण्यात येणार असून सदर बस काशीमिरा मार्गे जाणार आहे.
मिरा भाईंदर मधील भाविकांनी सदर बस सेवेचा लाभ घ्यावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!