*कोकण Express*
*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !!!*
आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने भूमिपुत्रांना स्वराज्याचे देखणं स्वप्न दाखवणारी..
छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अतुल्य युगपुरुष घडवणारी..
धर्मवीर संभाजी महाराजांसारखे अद्वितीय नरसिंह घडवणारी..
स्वराज्याच्या माध्यमातून हिंदुस्थानातील पहिलं लोकशाही राज्य घडवणारी..
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची आज जयंती तसेच हिंदू धर्माची पताका सात समुद्रा पलीकडे नेऊन हिंदू धर्माच्या उच्च प्रतीच्या तत्वज्ञानाचा जगात प्रसार करणारे योगीपुरुष स्वामी विवेकानंद यांची आज जयंती.
राष्ट्रमाता जिजाऊ आणि योगीपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपा तालुका कार्यालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुषमा खानोलकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत , महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर , महीला मोर्चा च्या वृंदा गवंडळकर व रसिका मठकर , अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , बुथप्रमुख हर्षल परब , दिपक परब , प्रथमेश सावंत , कार्यालय प्रमुख छोटु कुबल इत्यादी उपस्थित होते .