*कोकण Express*
*भालचंद्र महाराज यांचा जन्मसोहळा भाविकांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
योगियांंचे योगी, ब्रह्मांडनायक, राजाधिपती, कनकाधिपती परहमंस भालचंद्र महाराज यांचा 119 वा जन्मसोहळा भाविकांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला. हा जन्मोत्सव सोहाळा पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले अन् त्यांनी केलेल्या भालचंद्र महाराज की जय या घोषामुळे संस्थान परिसर अक्षरशः निनादून गेला होता. भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त गेले चार दिवस सुरु असलेल्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कणकवलीनगरी भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी भक्तांचा ओघ वाढला आहे.असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालंचद्र महाराज यांचा 119 वा जन्म दिन शुक्रवारी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी आज मुख्य दिवशी अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे संस्थान परिसरात भक्तांची मांदियाळी अवतरली होती. भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा सोमवारपासून सुरु झाला गेले चार दिवस वेगवेगळ्या भागासह जिल्ह्याच्या कानाकोपर्यांतून लाखोंच्या संख्येने भक्त कणकवलीत भाविक आले होते. भालचंद्र महाराज यांच्या 119 व्या जन्मदिनी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.

शुक्रवारी पहाटे 5.30 ते 8 यावेळेत काकड आरती, समाधीपूजा, जपानुष्ठान, 8 ते 9 यावेळेत भजने पार पडली. 9 ते 11.30 यावेळेत समाधीस्थळी लघुरुद्र झाला. जन्मोत्सवापूर्वी ह.भ.प.भाऊ नाईक यांचे कीर्तन पार पडले. त्यानंतर भालचंद्र महाराज यांचा जन्मसोहळा पार पडला. यावेळी बाबांची बालमूर्ती पाळण्यात घालून सुहासिनी पाळण गीते म्हटली. हा जन्मोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी महाआरती झाली. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. याच वेळेत गंधर्व फाऊंडेशनचा माझे जीवन गाणे हा भावभक्तीगीतांचा कार्यक्रम पार पडला. कलाकारांनी भावभक्ती गीते गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले. तदपूर्वी दुपारी भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी मूर्तीवर घातलेली शालेचा लिलाव पद्धतीने बोली लावून भक्तगणांनी शाल घेतली. सायंकाळी पाच नंतर बाबांची पालखी मिरवणूक कणकवली शहरातून निघणार आहे तरी सर्व भक्तांनी या पालखी मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थांनभालचंद्र महाराज यांचा जन्मसोहळा भाविकांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला…!






