नशिबापेक्षा स्वत:च्या मनगटावर विश्वास ठेवा:-* *सुर्यकांत तळेकर

नशिबापेक्षा स्वत:च्या मनगटावर विश्वास ठेवा:-* *सुर्यकांत तळेकर

*कोकण Express*

*नशिबापेक्षा स्वत:च्या मनगटावर विश्वास ठेवा:-* *सुर्यकांत तळेकर*

*कासार्डे माध्य. विद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न*

*कासार्डे : संजय भोसले*

नशिबापेक्षा स्वत:च्या मनगटावर विश्वास ठेवा. अपयश आले तर घाबरु नका, प्रत्येकाने ध्येय्य ठरवले पाहिजे आणि त्यासाठी प्रचंड मेहनत केली पाहिजे. तरच यश मिळू शकेल, असे प्रतिपादन सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुर्यकांत तळेकर यांनी केले. कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आणि सरस्वतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करुन उद्घाटन सुर्यकांत तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, प्रमुख पाहुणे वैभववाडी गटविकास अधिकारी तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी जयप्रकाश परब,शिक्षण समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा माजी विद्यार्थी विद्याधर राणे, संस्था पदाधिकारी आनंद कासार्डेकर, संजय पाताडे, रवींद्र पाताडे, दिपक गायकवाड, सहदेव म्हस्के, दिगंबर पाताडे, निवृत्त विस्तार अधिकारी तथा माजी विद्यार्थी सुहास पाताडे,प्राचार्य एम.डी. खाडये, पर्यवेक्षक नारायण कुचेकर,कासार्डे सरपंच
सौ.निशा नकाशे,उपसरपंच गणेश पाताडे, कासार्डे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सिध्देश डिगसकर,
माजी पोलीस पाटील नीलकंठ पाताडे,ग्रामसेवक गजानन कोलते, दारुम सरपंच तेजस्विनी लिंगायत, शालेय मुख्यमंत्री कस्तुरी मुंडले आदी उपस्थित होते.
दरम्यान याप्रसंगी बोलताना ग.शि. जयप्रकाश परब म्हणाले की, आजच्या तरुणांसमोर ध्येय्य नाही. यश मिळवायचे असेल तर संयम पाहिजे. संयम असेल आणि मेहनत घ्यायची तयारी असेल तर आयुष्यात खुप काही मिळवू शकता. ध्येय्य ठेऊन जगायला शिकले पाहिजे आणि वेळेची कदर करायला समजले पाहिजे. तरच आयुष्यात मोठे व्हाल. त्यासोबतच देशाची प्रतिमा मलिन होईल अशी कृती आपल्याकडून घडू नये, याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असा सल्लाही विद्यार्थ्यांना त्यांनी दिला.

*विद्यार्थ्यी लिखित ‘मेघदूत’ हस्तलिखीताचे प्रकाशन*
मुलांमधील अंगभूत कलांना वाव मिळावा आणि त्याला एकत्रित व्यासपीठ मिळावे. यासाठी दरवर्षी मुलांच्या विविध साहित्याने नटलेल्या ‘मेघदूत’ या हस्तलिखीताचे प्रकाशन केले जाते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या हस्तलिखीताचे प्रकाशन करण्यात आले.

*’उपक्रमशील’ पुरस्काराने शिक्षकांचा गौरव..*
कार्यक्रमामध्ये सन. 2020 वर्षातील उपक्रमशील शिक्षक अवधूत घुले,सन. 2021 मधील उपक्रमशील शिक्षक कला शिक्षक चंद्रशेखर कल्याणकर यांचा तर सन. 2022 या वर्षातील उपक्रमशील शिक्षिका सौ. मानसी कुडतरकर यांना ‘उपक्रमशील शिक्षक’ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी मागील दोन वर्षातील शैक्षणिक गुणवत्ता,कला, क्रीडा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी तसेच कै. काकासाहेब कुडतरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेतलेल्या चित्र रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.तसेच रोटरी क्लब ऑफ कुडाळ ‘नेशन ब्लिडर ऑवार्ड’ एस.व्ही.राणे यांना व ‘कोकणरत्न’ पुरस्कार प्राचार्य एम.डी.खाड्ये यांना आणि अंतर राज्य शैक्षणिक गौरव पुरस्कार शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत सावंत यांना मिळाल्याबद्दल या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
याप्रसंगी प्रभाकर कुडतरकर,विद्याधर राणे, अविनाश वाडये, संजय पाताडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी कासार्डे ग्रामपंचायत सदस्य प्रणय जोशी, आण्णा खाडये, सुभाष तळेकर,प्रशालेचे सेवानिवृत्त कर्मचारी अशोक मुद्राळे, श्रीम.सावंत, नंदकुमार नाडकर्णी, दत्ताराम शेलार, बाबल्या कदम, तसेच माजी विद्यार्थी यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एम डी. खाड्ये यांनी आवाहल वाचन व आभार नारायण कुचेकर यांनी मानले तर सुत्रसंचालन प्रा.रामचंद्र राऊळ यांनी केले. दुसऱ्या दिवसी रात्रौ प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अतिशय बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!