*कोकण Express*
*जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्ग संघटनेचा हळवल गावातील भाजप पुरस्कृत उमेदवारांना जाहीर पाठींबा..!*
*घरा – घरात जाऊन करणार भाजप पुरस्कृत उमेदवारांचा प्रचार..!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील हळवल गावात ठाकर समाजाचे सरपंच, सदस्य पदासाठी आरक्षण पडले आहे. असे असताना हळवल मध्ये याच विषयावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अलीकडेच ठाकर समाजाचे प्रलंबित प्रश्न आम. नितेश राणेंनी मार्गी लावले तसेच पुढे निर्माण होणाऱ्या समस्या आणि प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील असे विश्वासात्मक आश्वासन देखील आम. नितेश राणेंनी दिले.
Yes, we decided. Zilla Thakar Samaj Sindhudurg organization publicly supports the BJP sponsored candidates of Halwal village..!
आम.नितेश राणेंच्या या ठोस निर्णायक भूमिकेवर विश्वास ठेवून समाज्याच्या विकासासाठी एक पाऊल पुढे जाऊन आपल्या कठीण प्रसंगी मदत करणाऱ्यांच आपण देणं लागतो या विचाराने ठाकर समाज जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने ठाकर समाज बांधव भाजप पुरस्कृत उमेदवारांना व पक्षाला पाठिंबा देणार असल्याची माहिती जिल्हा कार्यकारिणी सल्लागार नामदेव ठाकूर व जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रविण ठाकूर यांच्यामाध्यमातून देण्यात येत आले. या बाबत झालेल्या बैठकीत अच्चुत मसके, सचिन ठाकुर, संकेत ठाकुर, यश म्हसकर उपस्थित होते.
समाजाला भाजपा पक्ष व आम. नितेश राणेंनी केलेली बहुमोल अशी मदत हे उद्याच्या नागरिकांचे भवितव्य घडवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकचा प्रचार भाजपा पक्षाने केलेली मदत व प्रयत्न घरा – घरात पोहोचवण्याचा निर्णय देखील ठाकर समाज बांधवांनी घेतला आहे. दोन दिवसांत गावा गावात ठाकर समाज वस्तीवर जावून समाज बांधव व – पदाधिकारी प्रचार करणार असल्याचे समाज बांधवांनी सांगितले आहे

