*कोकण Express*
*कणकवली ग्रा.पं.निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दोन अर्ज दाखल…!*
कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी २८ नोव्हें.पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कणकवली तालुक्यातील कलमठ प्रभाग क्रमांक ६ मधून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी प्रशांत भालचंद्र वनसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कणकवली तालुक्यात त्यांचा पहिला अर्ज दाखल झाला आहे. तसेच शिवडाव येथील प्रभाग २ मधून सर्वसाधारण जागेसाठी मारुती मनोहर म्हाडेश्वर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

