कलमठ मधील युवकांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

कलमठ मधील युवकांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

*कोकण Express*

*कलमठ मधील युवकांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश*

*तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, तालुका समन्वयक सुनील पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केला प्रवेश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

ग्रामपंचायत निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कलमठ गावातील युवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, तालुका समन्वयक सुनील पारकर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.तालुकाप्रमुख आणि तालुका समन्वयक पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अनुक्रमे भूषण परुळेकर आणि सुनील पारकर यांनी पक्षवाढीची जोरदार सुरुवात केली आहे. कलमठ सुतारवाडीतील तन्मय सावंत, प्रतीक बांदेकर, अनिकेत हडकर, प्रफुल्ल बाणे, निलेश हडकर, बाबू शिंदे, विनय सावंत, विकास राठोड, जन्नप्पा राठोड, संदेश गावडे, जयेश मोंडकर, दामोदर सावंत आदी युवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते भास्कर राणे, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, दामू सावंत, भाई पावसकर, निलेश तेली, बाबू रावराणे, राजन म्हाडगुत, बाळा गुरव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!