तरळे येथील शिवसेना पदाधिकारी – कार्यकर्ते भाजपात…!

*कोकण Express*

*तरळे येथील शिवसेना पदाधिकारी – कार्यकर्ते भाजपात…!*

*आम.नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश*

*कणकवली ः प्रतिनिधी* 

तळेरे येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. तळेरे ग्रामपंचायत सदस्या रिया भोगले यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेतुन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.

शिवसेनेचा एकमेव सदस्य ही भारतीय जनता पार्टीत दाखल झाल्यामुळे १०० टक्के ग्रामपंचायत सदस्य भाजपचे झाले आहेत. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी बांधकाम सभापती बाळा जठार , पं स सभापती दिलीप तळेकर , माजी जि . प . महिला बालकल्याण सभापती रत्नप्रभा वळंजू , तळेरे सरपंच साक्षी सुर्वे , भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , पं . स . सदस्य मनोज रावराणे , खारेपाटण शक्तिकेंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर , अण्णा कोदे आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार राजेश जाधव यांनी ओम गणेश बंगल्यावर भाजपामध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे जनतेच्या प्रश्नांना न्याय देत आहेत. त्यासाठी आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपात प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया राजेश जाधव यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!