नाटळची कन्या वृंदा पांगम राज्य युवा संसदकरिता पर्यावरण आणि वन मंत्री म्हणून नियुक्त

नाटळची कन्या वृंदा पांगम राज्य युवा संसदकरिता पर्यावरण आणि वन मंत्री म्हणून नियुक्त

*कोकण Express*

*नाटळची कन्या वृंदा पांगम राज्य युवा संसदकरिता पर्यावरण आणि वन मंत्री म्हणून नियुक्त*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नेहरू युवा केंद्र व युनिसेफच्या राज्यस्तरीय संसद योग्य निवडणूक राज्याच्या पर्यावरण संसद आणि वन मंत्री म्हणून कणकवली तालुक्यातील नाटळ गावची कन्या वृंदा पांगम हीची बहुमताने नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एकूण ७२ युवक व युवतींची निवड करण्यात आली होती. युवा संसद मंत्रीपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी मुळा नाटळ गावची पण सध्या राहणार वसई (जि. पालघर) वृंदा प्रशांत पांगम ही राज्य युवा संसदकरिता पर्यावरण आणि वन मंत्री पदासाठी बहुमतानी विजयी ठरल्यांने तीची या पदासाठी नियुक्ती झाली.
राज्यातील विविध प्रश्न युवकांच्या माध्यमातून पुढे यावे यासाठी नेहरू युवा केंद्र व युनिसेफ संस्थेच्या माध्यमातून नुकतेच मुंबई येथे राजभवनात राज्यस्थरीय युवा संस्थेचे आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातील एकूण ७२ युवक व युवतींची निवड करण्यात आली होती. युवा संसद मंत्रीपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी पालघर जिल्हा वसई तालुक्यातील वृंदा प्रशांत पांगम राज्य युवा संसदकरिता पर्यावरण आणि वन मंत्री पदासाठी बहुमतानी विजयी ठरल्या आणि त्या पदासाठी नियुक्ती झाली. राज्यस्तरीय युवा संसदकरिता पर्यावरण आणि वन मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यामुळे वसई तालुक्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. तसेच सिंधुदुर्गातून तीचे अभिनंदन करण्यात आले.
वृंदा यांना या निवडणुकीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, सर्वप्रथम मी माझ्या आई-वडिलांचे आभार मानते कारण त्यांनी माझ्यामध्ये सहकार्य व समाजसेवेचे बीज पेरले. त्या बीजाचे रोपटे कसे करायचे याचे मार्गदर्शन केले. त्याचाच परिणाम आज दिसून आला. मला लहानपणापासूनच समाज सेवा करण्याची सवय होती. त्याचबरोबर मला इतर व्यवस्थापनाची गरज म्हणून कार्य करण्याची आवड निर्माण झाली. पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, मानसिक आरोग्य इत्यादीवरील अनेक वेबिनारमध्ये भाग घेतला. ऑगस्ट २०२२ मध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या एनएसएस द्वारे (प्रेमलिला विठ्ठलदास पॉलिटेक्निक) बीचची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन सत्र आणि रस्ता सुरक्षा मोहिमेसारख्या इतर क्रियाकलपाद्वारे सामाजिक कार्य सुरू केले. बिस्लेरी इंटरनॅशनल लिमिटेड (सीएसआर विभाग) सह इंटर्नशिप केली. मला ग्लोबल रोड सेफ्टी च्या सहकार्याने युनायटेड वे मुंबई द्वारे बेस्ट रोड सेफ्टी लीडर म्हणून सन्मानित करण्यात आले.
राज्य संचालक नेहरू युवा केंद्र संघटना महाराष्ट्र, गोवा युनिसेफच्या आयोजनात ही राज्यस्तरीय संसद सर्वत्र योग्य निवडणूक प्रक्रिया म्हणून पार पडली. मी संपूर्ण महाराष्ट्रात ७०टक्के मतांनी निवडणूक जिंकली. मी पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत होती आणि माझी पर्यावरण आणि वन मंत्री म्हणून नियुक्ती झाली. या कार्यक्रमात मी विधान भवन आणि मंत्रालयाला भेट दिली. आम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांची भेट घेतली. युनिसेफचे प्रतिनिधी तानाजी पाटील आणि महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्य संचालक प्रकाश खत यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी, आई-वडील तसेच मित्र परिवाराचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असे वृंदा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!