एस. एम. हायस्कूल कणकवलीच्या स्वरांगी गोगटे व स्वानंद जोशी यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

एस. एम. हायस्कूल कणकवलीच्या स्वरांगी गोगटे व स्वानंद जोशी यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

*कोकण Express*

*एस. एम. हायस्कूल कणकवलीच्या स्वरांगी गोगटे व स्वानंद जोशी यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*कणकवली ः प्रतिनिधी*

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत कला उत्सव 2022-23 घेण्यात आला. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शास्त्रीय गायन, तालवाद्य वादन, स्वरवाद्य वादन, शास्त्रीय लोकनृत्य, पारंपारिक लोकनृत्य, नाट्य (भूमिका अभिनय) व त्रिमितीय शिल्प आदी कला प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्रीय गायन स्पर्धेत कु. स्वरांगी मिलिंद गोगटे व स्वरवाद्य वादन स्पर्धेत कु. स्वानंद विनायक जोशी या एस. एम. हायस्कूल कणकवलीच्या विद्यार्थ्यांना नेत्रदिपक यश संपादन केले आहे. प्रशालेच्या दोन्ही स्पर्धकांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अभिनंदन निवड झाली आहे.

कु. स्वरांगी मिलिंद गोगटे व कु. स्वानंद विनय जोशी यांचे कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे चेअरमन डॉ. एस. एम. तायशेटे, व्हा. चेअरमन एम. ए. काणेकर, सचिव डी. एस. नलावडे, मुख्याध्यापिका एस. एस. वायंगणकर, उपमुख्याध्यापक पी. व्ही. कांबळे, प्रभारी पर्यवेक्षक जी. एन. बोडके, समस्त शिक्षक वृंद, पालक वर्ग व जिल्ह्यातील सर्व कलाप्रेमींनी अभिनंदन केले आहे. दोन्ही स्पर्धकांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!