*कोकण Express*
*आगामी ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवण्याची भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा*
*लवकरच वरिष्ठ पातळीवर होईल निर्णय; राजन तेली यांची माहिती*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
आगामी ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवण्याची भावना आजच्या पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. मात्र याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरवरच घेण्यात येईल, पंरतू कार्यकर्ते ऍक्टिव्ह मोडमध्ये असून जास्तीत जास्त ग्रामपंचायत जिंकण्याची तयारी त्यांनी केली असून तयारीला लागा अशा सुचना त्यांना करण्यात आल्याची माहीती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मळगाव येथील भगवती सभागृहात भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या मेळाव्यानंतर श्री तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवींद्र मडगावकर, मनोज नाईक, महेश धुरी आदी उपस्थित होते.

