शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत यजमान कासार्डेसह, कुणकेश्वर,इळये,कुडाळ,बांव व डिगस विद्यालय अजिंक्य

शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत यजमान कासार्डेसह, कुणकेश्वर,इळये,कुडाळ,बांव व डिगस विद्यालय अजिंक्य

*कोकण Express*

*शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत यजमान कासार्डेसह, कुणकेश्वर,इळये,कुडाळ,बांव व डिगस विद्यालय अजिंक्य*

*कासार्डेतील जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचा निकाल जाहीर*

*तळेरे:-प्रतिनिधी*

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर सलग दोन दिवस पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय ‘आट्यापाट्या’ स्पर्धेत यजमान कासार्डेसह कुडाळ ज्यु.कॉलेज ,
जि.प.प्राथमिक शाळा इळये नं.१,कुणकेश्वर विद्यालय, बांव विद्यालय,व डिगस हायस्कूच्या संघाने प्रत्येकी एका गटांचे अजिंक्यपद पटकावून चौफेर यश संपादन आहे.तर या स्पर्धेत यजमान कासार्डे विद्यालयाच्या तब्बल चार संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

*जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-*

*१४ वर्षाखालील मुले-*
जि.प.इळये नं.१ ता.देवगड विजेता
कासार्डे हायस्कूल ता.कणकवली -उपविजेता
कुणकेश्वर हायस्कूल ता.देवगड- तृतीय
*१४वर्षाखालील मुली-*
कुणकेश्वर हायस्कूल ता. देवगड- विजेता
जि.प.इळये नं.१ता. देवगड उपविजेता
कासार्डे हायस्कूल ता.कणकवली – तृतीय
*१७ वर्षाखालील मुले-*
डिगस माध्यमिक विद्यालय ता कुडाळ – विजेता
कुडाळ हायस्कूल – उपविजेता
सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगांव ता.कुडाळ -त‌तीय

*१७ वर्षाखालील मुली-*
श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय बांव ता.कुडाळ – विजेता
माध्यमिक विद्यालय कुणकेश्वर ता.देवगड – उपविजेता
सह्याद्री माध्यमिक विद्यालय, भडगांव ता. कुडाळ -त‌तीय

*१९वर्षाखालील मुले-*
कासार्डे ज्यु. कॉलेज ता.कणकवली – विजेता
कुडाळ ज्यु.कॉलेज – उपविजेता
*१९वर्षाखालील मुली-*
कुडाळ ज्यु.कॉलेज – विजेता
कासार्डे ज्यु. कॉलेज ता.कणकवली – उपविजेता
या स्पर्धेला पंच म्हणून बाळासाहेब ढेरे, धर्मराज धुरत, दत्तात्रय मारकड,संजय वेतुरेकर,अनिकेत वेतुरेकर‌‌,मंगेश माने,श्री. मयेकर,श्री.खाकर
अनिल जमदाडे,दिवाकर पवार व अवधूत कानकेकर यांनी कामगिरी पार पाडली.
या स्पर्धेतील विजेत्या संघांची सातारा येथे होणा-या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व यशस्वी खेळाडुंचे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, क्रीडा अधिकारी मनिषा पाटील, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, यजमान कासार्डे विद्यालयाचे प्राचार्य एम.डी. खाड्ये व क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी अभिनंदन करुन विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!