*कोकण Express*
*सांगवेतील नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*नेत्र तपासणी केलेल्या आवश्यक असणाऱ्या सर्वांना मोफत चष्मे वाटप*
*मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया देखील गोट्या सावंत यांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील सांगवे गावामध्ये सांगवे ग्रामपंचायत येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे सांगवे ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि.प.अध्यक्ष गोट्या सावंत व संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नेत्र तपासणी शिबिरातील सर्वच नेत्र रुग्णांना आवश्यकते प्रमाणे मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे. तसेच या शिबिरादरम्यान ज्या रुग्णांना मोतीबिंदू आढळला अशा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया माजी जि.प.अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. यावेळी सरपंच मयुरी महेश मुंज, उपसरपंच प्रदिप विठ्ठल सावंत, ग्रामविकास अधिकारी प्रमोद राजाराम ठाकुर, तंटामुक्त अधिकारी विजय भोगटे, सदस्य अभिजीत काणेकर, राजेश सापळे, रमेश म्हापणकर, आश्विनी कांबळे, चेअमन प्रभाकर सावंत, व्हाईस चेअरमन चंद्ररत्न कांबळे, महेंद्र म. सावंत, रमेश सापळे, डॉ . तांबे आदी उपस्थित होते.

