फोंडाघाट येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या नुकसानीची कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

फोंडाघाट येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या नुकसानीची कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

*कोकण Express*

*मा.मुख्यमंञी महोदयांनी शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे दिले आदेश*

*फोंडाघाट येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या नुकसानीची कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी*

*फोंडाघाट ः संजना हळदिवे*

गेल्या चार दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे फोंडा घाट येथील शेतकऱ्यांचे भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे . यामुळे कृषी अधिकारी व कृषी मंडळ अधिकारी यांच्याकडून पाहणी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीची पहाणी तालुका कृषी अधिकारी मा.श्रीम.मुळे मॅडम, सुपरवाझर श्रीम.वेर्लेकर मॅडम, कृषी मंडळ अधिकारी श्री पवार, फोंडाघाट विकास सोसायटी चेअरमन श्री राजन नानचे, प्रभारी कृषी सहायक कु.प्रणाली सावंत फोंडाघाट विकास सोसायटी संचालक श्री. धृवबाळ गोसावी यांनी केली. यावेळेस शेतकरी श्री.बाळकृष्ण हीर्लेकर, श्री. कुमार नानचे,सौ.वैशाली तुकाराम बीले, श्री दशरथ रेडकर, आत्माराम सावंत उर्फ बाबू भिरंवडेकर, शामसुंदर उर्फ आबा तिरोडकर, प्रकाश नानचे मारूती राणे,विजय सामंत रामचंद्र मारूती गोसावी, अविनाश गोसावी आधी शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!