*जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती*
*जिल्ह्यात ३७९ सक्रिय रुग्ण*
*सिंधुदुर्गनगरी,ता.२१:*
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार २२० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.