फोंडाघाट महाविद्यालयात एनएसएस सप्ताहाचे उद्घाटन

फोंडाघाट महाविद्यालयात एनएसएस सप्ताहाचे उद्घाटन

*कोकण Express*

*फोंडाघाट महाविद्यालयात एनएसएस सप्ताहाचे उद्घाटन*

फोंडाघाटमधील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात एनएसएस सप्ताहाचे निमित्ताने विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री. सुभाष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

एनएसएस विभाग व कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात *ई पीक पाहणी प्रशिक्षण* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला सांगवे मंडल अधिकारी श्री. दिलीप पाटील यांनी ई पीक पाहणी म्हणजे काय ते सांगून त्याचे महत्त्व स्पष्ट केले. यामुळे आपण कोणत्याही ठिकाणाहून आपला सातबारा उतारा सहज घेऊ शकतो, असे सांगितले. यावेळी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा. संदेश सावंत यांनी विद्यार्थ्यांना आपल्या पालकांची व आपल्या वाडी व गावातील इतर शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करण्याचे आवाहन केले. कणकवली पंचायत समितीच्या माजी सभापती मा. सौ. सुजाता हळदिवे – राणे यांनीही महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

दुसऱ्या सत्रात प्रशिक्षक मा. बाजीराव काशीद यांनी विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी ॲपची सविस्तर माहिती देऊन आपल्या मोबाईल वरुन आपण ई पीक पाहणी कशी करावी याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसनही केले.

या कार्यक्रमाला फोंडाघाट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले, फोंडाघाट मंडल अधिकारी मा. साै. नीलिमा प्रभुदेसाई, फोंडाघाट तलाठी मा. अरुणा जयानवार इ. मान्यवर, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी तर आभार प्रा. संतोष आखाडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!