*कोकण Express*
*७ ऑक्टोबरपासून मा.श्री.राजसाहेब ठाकरेंचं ‘मिशनकोकण’*
*रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांचा करणार दौरा…!*
*मुंबई :*
मनसेप्रमुख मा.श्री.#राजसाहेब_ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच विदर्भ दौरा केला होता…विदर्भ दौऱ्यानंतर आता राजसाहेब ठाकरे हे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत…येत्या ७ ऑक्टोबरपासून राजसाहेब ठाकरे यांच्या ‘मिशन कोकणला’ सुरुवात होणार आहे…यांचा हा दौरा ६ दिवसांचा असणार आहे…ते 🚙#कोल्हापुरातून_तळकोकणात_दाखल🚙 होणार आहेत…
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात प्रत्येकी २ दिवस राजसाहेब ठाकरे यांचा दौरा असणार आहे…आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजसाहेब ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे…यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील #मनसे_सैनिकांमध्ये_उत्साह दिसून येत आहे…
या दौऱ्यामध्ये राजसाहेब ठाकरे हे मनसे कार्यकर्त्यांशी आणि “#स्थानिक_पदाधिकाऱ्यांना_मार्गदर्शन” करणार आहेत…तसेच #पक्षाच्या_कामगिरीचा_आढावा घेण्याची देखील शक्यता आहे…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत…निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानण्यात येत आहे…विदर्भाप्रमाणेच राजसाहेब ठाकरे आपल्या कोकण दौऱ्यात देखील पक्षाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात…