राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना लसिकरणामुळे होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी तयारीत रहावं – आरोग्य मंत्रालय

*कोकण Express*

*राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना लसिकरणामुळे होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी तयारीत रहावं – आरोग्य मंत्रालय*

कोरोना विषाणू लसिकरणामुळे होणाऱ्या कोणत्याही संभाव्य दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी सरकारनं नियमावली तयार केली आहे, असं आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. लसिकरणाच्या प्रत्येक सत्रात मर्यादित रूग्णांना लस दिली जाईल.

लस दिल्यानंतर अर्धा तास रूग्णांना देखरेखीखाली ठेवणं या नियमावलीनुसार बंधनकारक आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अशा प्रकारच्या घटनांचा सामना करण्यासाठी तयारीत रहावं असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

प्रत्येक जिल्ह्यात त्यासाठी किमान एक तरी केंद्र उभारलं जावं, असे आदेश आहेत. याशिवाय राज्यांमधे आरोग्य केंद्र, खाजगी आरोग्य केंद्र त्यासाठी काम करतील. सगळ्यात आधी ही लस आरोग्य सेवक, आघाडीवर काम करणारे आणि ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना दिली जाईल.

त्यानंतर ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना तसंच संबंधितांना आणि त्यानंतर लस उपलब्धतेनुसार उर्वरित लोकसंख्येला लस दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!