*कोकण Express*
*नेहरू युवा केंद्रांतर्गत देवगड समुद्र किनाऱ्यावर राबविण्यात आली स्वच्छता मोहीम*
*रोट्रॅक्ट क्लब कणकवली, देवगड नगरपंचायत आणि अनुभव शिक्षा केंद्र यांचे सहकार्य*
*देवगड ः प्रतिनिधी
नेहरू युवा केंद्रांतर्गत देवगड समुद्र किनारा येथे रोट्रॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, देवगड नगरपंचायत, अनुभव शिक्षा केंद्र महाराष्ट्र यांच्या सहकार्याने समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. देवगड समुद्र किनारा परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आला. सामाजिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या वतीने समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला. या मोहीमेअंतर्गत किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना कचरा होऊ न देण्यासाठी सुचना देण्यात आल्या. तसेच प्लास्टिकमुळे संभवणारे धोके, आजूबाजूला फोडलेल्या काचेच्या बॉटल्समुळे माणसांना तसेच समुद्री जीवांना होणारे जिवीताचे धोके याबाबत माहिती देण्यात आली. प्लास्टिक पिशवी ऐवजी कागदी किंवा कापडी पिशवीचा वापर करण्याचा सुचना उपस्थितांना देण्यात आल्या.
या उपक्रमात नेहरू युवा केंद्राचे देवगड तालुका समन्वयक सुजय जाधव, कणकवली तालुका समन्वयक अक्षय मोडक, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्षा श्रद्धा पाटकर, आकांक्षा तांबे, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर , देवगड नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी उस्मान नाईक तसेच साहिल आचरेकर, मयुरेश घाडी यांनी सहभाग घेतला होता.