*कोकण Express*
*कोकणातील अभियांत्रिकी क्षेत्रातील विश्वासार्ह नाव फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नॉलॉजी*
*रत्नागिरी | प्रतिनिधी*
कोकणातील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षण वाजवी शुल्कामध्ये उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १९९६ साली सुरु झालेल्या फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षात प्लेसमेंटमध्ये मोठी भरारी घेतली आहे. सर्वसाधारणपणे, अभियांत्रिकी महाविद्यालयची निवड हि प्लेसमेंटचा निकष समोर ठेवूनच केली जाते. त्याच प्लेसमेंट निकषांमध्ये चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच वर्ष २०२२ – २३ मधील जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात ॲकॅडमीमधील ५० हुन अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. यामध्ये बेंचमार, इन्फोसिस, फौरसिया, काणेकर कन्सल्टन्सी, नुकसोफ्ट, स्टार इंजिनीअर्स या कंपन्यांचा समावेश आहे.
मागील शैक्षणिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ मध्ये अॅकॅडमीमधील ३३५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची विविध नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये कोकणातील ७५% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
वर्ष २०२१-२२ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये ६५ कॅपजेमिनी मध्ये ३८, फ्लेक्स मध्ये २७, इन्फोसिस मध्ये २९ तर विप्रो मध्ये २७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.. फिनोलेक्स ॲकॅडमीने प्लेसमेंटचा चढता आलेख मागील ५ वर्षे कायम राखला आहे. मागील पाचही वर्षे ८०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी निर्माण करून देण्यामध्ये महाविद्यालय यशस्वी ठरले आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये एकूण २०६ तर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये २६६ विद्यार्थ्यांची यशस्वी प्लेसमेंट महाविद्यालयाकडून झाली आहे. ह्या प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक म्हणजे वार्षिक १० लाखाचे सॅलरी पॅकेज बायजुझ कंपनीने देऊ केले आहे.
फिनोलेक्स ॲकॅडमीमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटच्या दृष्टीने परिश्रम घेतले जातात. ह्यामध्ये मुख्यत्वे विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी, त्यासाठी लागणारी पात्रता ह्या गोष्टींची ओळख तसेच ह्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आवश्यक असलेली बौद्धिक, तांत्रिक कौशल्ये, संभाषण कौशल्ये ह्यावर नियमितपणे तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थी दुसऱ्या वर्षांमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांना त्यांच्या शाखेशी संबंधित सर्व क्षेत्रांची आणि त्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधींची माहिती करून दिली जाते आणि त्यांना नियमित शिक्षणाबरोबरच अधिकचे शिक्षण कसे दिले जाईल ह्याचा आराखडा बनविला जातो. हेच विद्यार्थी तिसऱ्या वर्षामध्ये असताना त्यांना मुख्यत्वे त्यांचा कल ओळखून त्यानुसार अधिकचे तांत्रिक ज्ञान दिले जाते. ह्यासाठी इंडस्ट्रीमधील एक्सपर्ट्स तसेच इंडस्ट्रीमध्ये चांगल्या हुद्द्यावर असणारे माजी विद्यार्थी तसेच ॲकॅडमीमधील आय. आय. टी (IIT), एन. आय. टी (NIT), आय आय एस सी (IISc) सारख्या शैक्षणिक संस्थांमधून शिक्षित प्राध्यापक वर्गाची देखील मदत घेतली जाते. अभियांत्रिकी शिक्षण चालू असताना इंडस्ट्रीमध्ये काय चालते आणि कोणत्या कौशल्यांची तेथे गरज असते हे समजण्यासाठी नियमितपणे इंडस्ट्री ट्रेनिंग किंवा इंटर्नशिप्ससाठी देखील विद्यार्थ्यांना पाठवले जाते. विविध कंपन्यांना कॅम्पस प्लेसमेंटसाठी आमंत्रित करण्यासाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग सातत्याने कंपन्यांच्या संपर्कात राहतात. महाविद्यालयातील सर्व शाखांमध्ये त्या त्या क्षेत्रातील काही नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. ह्या करारांद्वारे त्या त्या इंडस्ट्रीमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन नियमितपणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मिळत असते. काही कंपन्यांशी असलेल्या सामंजस्य कराराद्वारे महाविद्यालयामध्ये इंटेल सेंटर ऑफ एक्सेलन्स, सेंटर ऑफ एक्सेलन्स इन कॉम्पुटर व्हिजन प्रॉडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट सेंटर सारख्या अद्ययावत प्रयोगशाळाही विकसित करण्यात आल्या आहेत. मायक्रोसॉफ्ट, सिस्को, कोर्सेरा, इसरो, रेड हॅट सारख्या नामांकित संस्थाबरोबरील शैक्षणिक सहयोगाद्वारे ॲकॅडमीमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मदत होते आहे. अधिक माहिती साठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. डॉ. मिलिंद यादव (८६६८७६२६४४), प्रा. प्रवण ठाकूर (९६२३६६०६८८) आणि प्रा. प्रशांत गिरी (९६६५२४८१७८)
ठळक वैशिष्ट्ये
– शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये ३३५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड
– शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये एकूण २०६ तर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये २६६ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
– कोकणातील ७५% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी → मागील पाचही वर्षात ८०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी
– बायजूझ कंपनीकडून सर्वाधिक म्हणजे वार्षिक १० लाखाचे सॅलरी पॅकेज