*कोकण Express*
*एकवीस दिवसांच्या गणपतींचे विसर्जन…!*
*रिक्षा संघटनेच्या गणपतीची शहरातून काढली वाजत-गाजत विसर्जन मिरवणूक…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला… अशा जयघोषात भाविकांनी २१ दिवसांच्या गणरायाला कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी निरोप देण्यात आला. रिक्षा चालक-मालक संघटनेच्या सार्वजनिक गणपतीची शहरातून वाजत-गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे. यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. गणरायाच्या आगमानने गणेश भक्तांमध्ये भक्तिमय वातावरण होते. विसर्जनस्थळी गणेशभक्तांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. कोरोनाचे सावट ओसरल्यामुळे गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात यंदा गणेशोत्सव साजरा केला. रिक्षा संघटनेच्या सार्वजनिक गणपतीची
शहरातून बेंजोच्या तालात, ढोल-तशांच्या गजरात आणि फटक्यांची आतषबाजीत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यात रिक्षा चालक-मालकांसह गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. संघटनेच्या सार्वजनिक गणेशोत्सवात गेले २० विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. रिक्षा संघटनेतर्फे प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे असंख्य भाविकांनी दर्शन घेतले.