*कोकण Express*
*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने* *सार्वजनिक बांधकाममंत्री सन्मा. रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस विवीध सेवाकार्य आयोजित करुन उस्ताहात साजरा*
*भाजपा च्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात १६ ठीकाणी विवीध सेवाभावी कार्यक्रम*
*वेंगुर्लेत ठीक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप*
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री. भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका भाजप च्या वतीने परबवाडा येथे शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटून व शाळेला प्रथमोपचार पेटी देऊन साजरा करण्यात आला. यावेळी साहेबांना दीर्घायुष्य लाभुदे म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सरपंच पपू परब, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, उपसरपंच हेमंत गावडे, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , शाळा मुख्याध्यापिका रोड्रिस मॅडम, केंद्रप्रमुख अडुलकर सर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, माजी उपसरपंच संजय मळगावकर , संतोष सावंत , ता.चिटणीस समीरभाई चिंदरकर , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , रविंद्र शिरसाठ , महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर , जाधव सर , पास्ते सर ग्रामपंचायत कर्मचारी राजा परब उपस्थित होते .