*कोकण Express*
*महिला विनयभंग प्रकरणी शासकीय अधिकारी शिवाजी खरातला देवगड पोलिसांनी केली अटक*
*देवगड ः प्रतिनिधी*
महिला बचत गटांच्या जीवन्नोती अभियान व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या देवगड येथील अधिकारी शिवाजी पांडुरंग खरात याने सहकारी महिला कर्मचारीचा विनयभंग केल्याप्रकरणी खरात याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. सहकारी महिला कर्मचारीचा विनयभंग करून तिला अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवाजी खरात विरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खरात यांच्याविरोधात भा.दं. वि. 354, 354 A (4), 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्यानुसार शिवाजी खरात याला देवगड पोलिसांनी ताब्यात घेत त्याची इळये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अटक केली आहे. शिवाजी खरात याने 2018 पासून आपला नेहमीच मानसिक, शारीरिक छळ केला तर 11 ऑगस्ट रोजी मीटिंगमध्ये सभागृहात सर्वांत देखत विनयभंग करून शिवीगाळ केली. मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार महिलेने दिली आहे.
दरम्यान देवगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही 11 ऑगस्ट रोजी देवगड पोकळे बिल्डिंग येथे बैठक चालू असताना बोलावून घेऊन शिवीगाळ केली. हात पकडून तो पीरगळला आणि अश्लील शब्दात शिवीगाळ केली. मी सांगते तसेच कर आणि तसेच करायचे जास्त शहाणपणा करायचा नाही. असे केले नाहीस तर तुला बघून घेईन, अशी धमकी देत अंगावर धावून येत मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मानसिकदृष्ट्या घाबरलेल्या पीडित महिलेची प्रकृती बिघडली. अखेर प्रकृती सुधारल्यानंतर देवगड पोलीस ठाण्यात जाऊन तीने रीतसर तक्रार नोंदवली आहे. दरम्यान शिवाजी खरात याचेवर भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी देवगड पोलिसांनी खरात याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
