उमेद अभियान मधील महिलांचे देवगड पोलिसांना निवेदन

उमेद अभियान मधील महिलांचे देवगड पोलिसांना निवेदन

*कोकण Express*

*उमेद अभियान मधील महिलांचे देवगड पोलिसांना निवेदन*

*उमेद अभियान व्यवस्थापक खरात यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा*

*&खरात यांनी आ.नितेश राणेंसह सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा केला होता आरोप*

*देवगड  ः प्रतिनिधी*

देवगड तालुका उमेद अभियान व्यवस्थापक शिवाजी खरात याना रानभाजी महोत्सवात झालेल्या मारहाणीचा आम्ही निषेध करत असून मारहाण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करून मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशा मागणीचे लेखी निवेदन देवगड तालुक्यातील उमेद अभियानमधील 60 हुन अधिक महिलांनी देवगड पोलीस ठाण्यात दिले आहे. तर उमेद व्यवस्थापक शिवाजी खरात यांनी आपल्याला आ. नितेश राणे, संदीप साटम व आणखी काहींनी मारहाण केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता.त्यानंतर आज शिवाजी खरात यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत उमेद अभियानमधील सुमारे 60 हून अधिक महिलांनी एकत्रित पोलीस ठाणे गाठत खरात यांना मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ठोस कारवाई न केल्यास उमेद अभियानातील महिला आक्रमक होतील असा इशाराही निवेदनात दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!