पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून पती निर्दोष

पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून पती निर्दोष

*कोकण Express*

*पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून पती निर्दोष*

*प्रतिनिधी : कणकवली*

जेवण न केल्याच्या रागातून दारूच्या नशेत पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन खूनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून तालुक्यातील करंजे सातोसेवाडी येथील सुधीर रघुनाथ सातवसे याची प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. व्ही. हांडे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

दि. ९ जानेवारी २०१७ रोजी फिर्यादी सविता सातवसे ही आपल्या रत्नागिरी येथील विवाहीत मुलीकडून घरी आली होती. यावेळी आरोपी दारूच्या नशेत घरी आला व तीला जेवणाची मागणी केली. अन्यथा आत्ताच्या आत्ता घरातून चालती हो, म्हणून शिवीगाळ करू लागला. यावेळी उभयतांत वादावादी झाली. त्याचा राग येऊन तुला ठार मारतो, कायमची कटकट मिटवितो, असे म्हणून ती कॉटवर झोपलेली असताना तीच्या अंगावर रॉकेलचा कॅन ओतला व काही कळायच्या आता माचिसने पेटवून दिले. त्यामुळे तीचा चेहरा, पाय, पोट भाजून जखमा झाल्या. यावेळी तीने तातडीने आरडाओरड केल्याने शेजारची महिला धावत येत तीला वाचवले. तसेच कणकवली येथील भावाला फोन करून दवाखान्यात दाखल केले. याबाबत तीने दिलेल्या फिर्यादीरून आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३०७, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुनावणीदरम्यान, फिर्यादी पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीतील तफावतीमुळे तसेच पुरेसा वैद्यकीय पुरावा नसल्याने न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!