२ वर्षांपूर्वी सत्ताधारी शिवसेनेकडून गोठोस नुतन ग्रृप ग्रामपंचायत इमारतीचे नूतन वास्तू प्रवेश,पुन्हा विरोधकांना डावलून आज वास्तू प्रवेश

२ वर्षांपूर्वी सत्ताधारी शिवसेनेकडून गोठोस नुतन ग्रृप ग्रामपंचायत इमारतीचे नूतन वास्तू प्रवेश,पुन्हा विरोधकांना डावलून आज वास्तू प्रवेश

*कोकण Express*

*२ वर्षांपूर्वी सत्ताधारी शिवसेनेकडून गोठोस नुतन ग्रृप ग्रामपंचायत इमारतीचे नूतन वास्तू प्रवेश,पुन्हा विरोधकांना डावलून आज वास्तू प्रवेश…*

*सिताराम जानकर:निमंत्रण पत्रिकेत फक्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे,नक्की ग्रामपंचायत कोणाची गावाची की? भाजपची…*

*कुडाळ ः  प्रतिनिधी*

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आज दुसऱ्यांदा गोठोस ग्रुप ग्रामपंचायत इमारतीचे नूतन वास्तु प्रवेश करण्यात येत आहे.त्यावेळी श्री.सत्यनारायणाची महापूजा घालण्यात आली होती.आता पुन्हा श्री.सत्यनारायणाची महापूजा घालण्यात येणार आहे.
जनसुविधा तसेच २५/१५ च्या निधितून १५ लाख रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या गोठोस नुतन ग्रृप ग्रामपंचायत इमारतीचे नूतन वास्तू प्रवेश २ वर्षांपूर्वी सत्ताधारी शिवसेनेने माजी सरपंच सानिका डीगे यांच्या कालावधीत माजी उपसभापती सौ.श्रेया परब यांच्या हस्ते थाटामाटात नूतन वास्तू प्रवेश केले होता.
आता पुन्हा याच गोठोस नुतन ग्रृप ग्रामपंचायत इमारतीचे वास्तू प्रवेश भाजपच्या पुढाऱ्यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी होत असल्याने गावात मात्र वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
तर पुन्हा पुन्हा अशी वास्तू प्रवेश कशाला तसेच गोठोस नुतन ग्रृप ग्रामपंचायतीने जी निमंत्रण पत्रिका छापली आहे.या पत्रिकेत फक्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे घालण्यात आली आहेत.त्यामुळे ही ग्रामपंचायत नक्की कुणाची गावाची की? भाजप पक्षाची असा सवाल ग्रामपंचायत सदस्य सिताराम जानकर यांनी केला असून,या वास्तू प्रवेशासाला विरोध केला आहे.
तर ग्रामसेवक यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव घालण्यात आले आहे. त्यामुळे हे ग्रामसेवक भाजपचे की? काय याचीही सखोल चौकशी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत होण्याची गरज असल्याचे श्री.जानकर यांनी सांगितले.तर शिवसेनेकडुुही विरोधही या कार्यक्रमाला असल्याचे शिवसैनिक म्हणाले.

तर गावातील एक पुढारी वरिष्ठांना खुश करण्यासाठी ही मोठी खटापट करीत असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!