*कोकण Express*
*कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांची राजन चीके आणि सुधीर नकाशे यांनी घेतली भेट…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांची कणकवली भाजपाचे तालुकाध्यक्ष राजन चिके व वैभववाडी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान आपण लवकरच सिंधुदुर्ग दौर्यावर येणार आहे, असा शब्द श्री. चव्हाण यांनी दिला. यावेळी तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात चर्चा झाली.