*उदय सामंत यांना मंत्री पद मिळाल्यानंतर शिंदे गटाचे शिवसैनिक मा. जि प सदस्य संजय आग्रे यांचा जल्लोष*
*कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके लावून पेढे वाटले**कणकवली ः प्रतिनिधी*सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व शिंदे शिवसेना व भाजपा च्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उदय सामंत, दीपक केसरकर यांनी नवीन मंत्रिमंडळात शपथ घेतल्याबद्दल कणकवलीत शिंदे गटाच्या शिवसैनिकांकडून कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. फटाके लावून शिवसैनिकांनी जल्लोष केला. त्यावेळी शिंदे साहेब आगे बढो, दीपक केसरकर आगे बढो, उदय सामंत आगे बढो, किरण सामंत आगे बढो च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच उपस्थितांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी शिंदे गट शिवसेनेचे शिवसैनिक माजी जि प सदस्य संजय आंग्रे, माजी सभापती संदेश पटेल, भास्कर राणे, भूषण परुळेकर, शेखर राणे, सुनील पारकर, बाळू पारकर, संदीप खानोलकर, एपी सावंत, चिन्मय राणे, दीपक राऊत, सुनील हरमळकर, बाळू मेस्त्रीआदी उपस्थित होते.