*कोकण Express*
*विजयदुर्ग गिर्ये भागात पर्यटन प्रकल्प राबवावा, व्यापारी संघाची आ. नितेश राणे यांच्याकडे मागणी*
*देवगड ःःप्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांनी आज देवगड दौरा केला यावेळी व्यापारी संघाने त्यांची भेट घेतली यावेळी व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष शैलेश कदम , व्यापारी दिनेश पटेल, मधु नलावडे, प्रमोद नलावडे, श्री मेस्त्री नीलकंठ मालंडकर, दयानंद पाटील व्ही. सी. खडपकर व अन्य व्यापारी उपस्थित होते आमदार नितेश राणे यांना व्यापारी संघाच्या वतीने आज निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे
गिर्ये रामेश्वर परिसरात प्रकल्पासाठी आवश्यक असलेली १००० एकर किंवा त्यापेक्षा अधिक मुबलक जमीन उपलब्ध आहे, या ठिकाणी एखादा मोठा पर्यटन प्रकल्प राबवण्याचे धोरण अवलंबिल्यास तालुकावासिय म्हणून आम्हाला आनंद होईल.
त्यामुळे देवगडचा आंबा, मासळी त्याचबरोबर पर्यटन क्षेत्रात विकास साधण्याची तालुका वासियांना संधी
मिळेल. देवगड आणि विजयदुर्ग बंदर परिसरात पूर्वीपासूनच व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जातात. अशा वेळी प्रकल्प या परिसरात राबविला गेल्यास बंदरांच्या दृष्टीने उर्जितावस्था येईल त्यामुळे या मागणीचा अभ्यासपूर्ण विचार करून प्रकल्प राबवावा असे म्हटले आहे
आमदार नितेश राणे यांनी याबाबत होकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे