*कोकण Express*
*यंगस्टार मित्र मंडळातर्फे कबड्डीपटू प्रणय राणे यांचा सत्कार*
*प्रो कबड्डीच्या ९ व्या पर्वासाठी यु मुंबा संघात प्रणय राणे याची झाली निवड*
*कणकवली I प्रतिनिधी*
प्रो कबड्डीचे ९ व्या पर्वासाठी यु मुंबा संघात एन.वाय.पी. कॅटेगरीमधून यंगस्टार मित्रमंडळाचा कबड्डीपटू प्रणय राणे याची निवड झाली आहे. प्रणयची हा निवड कणकवली तालुक्यासाठी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरारोवणारी आहे. प्रो कबड्डी स्पर्धेसाठी यंगस्टारचा खेळाडू प्रणय राणे याची निवड झाल्याबद्दल अध्यक्ष म्हणून मला व मंडळाला याचा सार्थ अभिमान आहे. प णय राणे याने कबड्डी खेळात अष्टपैलू कामगिरीकरुन यंगस्टारचे नाव मोठे केले आहे. आता मंडळाच्या कबड्डीपटूची भविष्यात प्रो कबड्डी व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये निवड होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा यंगस्टार मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य तथा कबड्डीपटू अनिल हळदिवे यांनी व्यक्त केली.
प्रो कबड्डीचे ९ व्या पर्वासाठी यु मुंबा संघात एन.वाय.पी. कॅटेगरीमधून कणकवलीचा सुपुत्र व यंगस्टार मित्रमंडळाचा कबड्डीपटू प्रणय राणे याचीनिवड झाली आहे. याबद्दल यंगस्टार मित्रमंडळातर्फे त्यांचा सत्कार सोहळा येथील भालचंद्र महाराज संस्थाच्या सभागृहात आयोजित केला होता. या प्रसंगी श्री हळदिये बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री काशिविश्वेवर मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पारकर, यंगस्टार मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाचे व्यवस्थापक विजय केळुसकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, मंडळाचे उपाध्यक्ष भैय्या आळवे, विनय राणे, गणपत मालंडकर, माजी नगरसेवक अभय राणे, नितीन केळुराकर, रुपेश परब, अस्मिता राणे दळवी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व प्रणयचे कुटुंबीय उपस्थित होते.
अनिल हळदिवे म्हणाले, यंगस्टार मित्रमंडळ गेली ४० वर्षे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. या स्पर्धेतून अनेक खेळाडू तयार झाले असून त्यांनी अष्टपैलू कामगिरी करत कबड्डी खेळात आपला दबदबा निर्माण करून बंगरटारचा नावलौकिक वाढवला आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. कबड्डी स्पर्धांचे आयोजन करताना ४० वर्षांच्या कालावधीत अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, तरी देखील स्पर्धांच्या आयोजनांमध्ये खंड पडला आहे. प्रणय हा यंगस्टाराचा कबड्डीपटू असून आता त्याची प्रो कबड्डीसाठी यु मुंबा संघात एन.वाय.पी. कॅटेगरीमधून निवड झाली आहे. भविष्यात त्याने राष्ट्रीय व आतंरराष्ट्र ीय कबड्डी स्पर्धेत निवड होण्यासाठी मेहनत घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अॅड. प्रवीण पारकर म्हणाले, प्रो कबड्डीसाठी यंगस्टारचा खेळाडू प्रणय राणे याचीनिवड झाली ही बाब कणकवली व सिंधुदुर्गाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे. कबड्डी खेळातील प्रणयची ही शेप कौतुकास्पद आहे. भविष्यात त्याने राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत प्रतिनिधित्व करावे.
अण्णा कोदे म्हणाले, सिंधुदुर्गातून राज्य व राष्ट्रीय कबड्डीपटू तयार व्हावे याकरिता गेली ४० वर्षे यंगस्टार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. यंगस्टारचा खेळाडू प्रणय राणे याची प्रो कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्याने मंडळाने आजपर्यंत घेतलेल्या स्पर्धाचे सार्थक झाले आहे. प्रो कबड्डीसाठी आमच्या मंडळाचा खेळाडूची निवड होणे ही बाब अभिमानास्पद असून प्रो कबड्डी स्पर्धेदरम्यान प्रणयता तुला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर निःसंकोचपणे सांग, ती तुला केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रमेश जोगळे म्हणाले, प्रणयने आता यंगस्टारचे कबड्डीपटू भविष्यात प्रो-कबड्डी, राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांची निवड व्हावी याकरिता त्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.प्रणयचे वडिल विनय राणे यांनी आपल्यामनोगत व्यक्त करताना प्रणयचा या यशामध्ये यंगस्टराचा सिंहाचा वाट असूनयंगस्टारमुळे त्याची ओळख सर्वदूर झाली असून प्रणयच्या या यशाचे श्रेय यंगस्टरला जाते.
मी एक सर्वसामान्य कबड्डीपटू असून प्रो कबड्डी स्पर्धेच्या निवडपर्यंत यशस्वी प – वासात माझ्या कुटुंबीयांचा व यंगस्टारचा मोलाचा वाटात असल्याचे त्याने आवर्जून सांगितले. यापुढे सिंधुदुर्गातील अनेक खेळाडू गुणवंत असून त्यांनाही अशा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावी, यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करू, पण कष्ट वनियमित खेळाचा नियमित सराव करणे हे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे हा सत्कारसोहळा कौटुंबीक असून मला आनंद देणार असल्याचे सांगून त्याने आपल्या यायशाचे श्रेय यंगस्टार व कुटुंबीयांना दिले. यावेळी यंगस्टार मित्रमंडळ व अभय राणे मित्रमंडळातर्फे प्रणय राणे याला पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भालचंद्र महाराज यांची प्रतिमा देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.