देवगड पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर

देवगड पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर

*कोकण Express*

*देवगड पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर*

*शिरगाव अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित, अनेक प्रस्थापित उमेदवारांना धक्काआहे*

*देवगड  ः  प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांच्या उपस्थितीत तहसीलदार मारुती कांबळे यांनी जाहीर केली. त्यात अनेकांना धक्का बसला आहे.

आरक्षण पुढीलप्रमाणे;

अनुसूचित जाती महिला – शिरगाव नामप्र महिला -पुरळ, दाभोळे, नामाप्र प्रवर्ग – नाडण, पडेल; सर्वसाधारण महिला -कुवळे, महाळुंगे, विजयदुर्ग, बापर्डे, मोंड; सर्वसाधारण प्रवर्ग – पोंभुर्ले, गोवळ, कुणकेश्वर, किंजवडे, मिठबाव, मुणगे यांचा समावेश आहे.

पारदर्शक काचेच्या डब्ब्यात चिठ्ठ्या टाकत चैतन्या पांचाळ या लहान मुलीच्या हस्ते चिठ्या काढून आरक्षण काढण्यात आले. प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार मारुती कांबळे, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत होत आहे.

या आरक्षण सोडतिला शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, काँग्रेस तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र जोगल, माजी जिल्हा परिषद सदस्य वर्षा पवार आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!