*कोकण Express*
*शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांना पुत्रशोक…*
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा मुलगा देवेंद्र पडते (वय-२८) याचा गोवा येथील खासगी रुग्णालयात काल रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आज दुपारी साडे बारा वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याच्या अकाली निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
दोन दिवसांपूर्वी अंघोळ करून बाहेर पडल्यानंतर देवेंद्र याच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्याला अधिक उपचारासाठी गोव्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे वडील, आई, बहीण, काका, काकी, चुलत भावंडे असा परिवार आहे.